Uncategorized

इच्छुक विटेकर बोर्डीकर बाबाजानी मुरकुटे लहाने फड केंद्रे यांच्या सह अनेकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

बोर्डीकर विटेकर बाबाजानी मुरकुटे लहाने यांच्या सह अनेकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

 

परभणीतून महायूतीचाच खासदार निवडून आणणारच
नेतेमंडळीनीचा संकल्प.

परभणी :
पाथरी रस्तावरी्ल रेणूका मंगल कार्यालयात रविवारी आयोजित केलेल्या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यातून घटक पक्षाच्या नेतेमंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लोकसभा जिंकण्याचा संकल्प करतेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

भाजपाच्या परभणी जिल्हा समन्वयक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळातील जनसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना मुळेच तिसऱ्या वेळी सुद्धा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक असून या मध्ये परभणी जिल्हा देखील मागे राहणार नसून प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या जीवाचे रान करून परभणी लोकसभेची जागा निवडून आणण्यास प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन्मनाने ही महायुती स्वीकारलेली असून कोणत्याही घटक पक्षाचा महायुतीने दिलेला उमेदवार विजयी करण्याचा दृढ विश्वास यानिमित्ताने बोलून दाखविला.
राजेश विटेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत अजित दादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीमध्ये मोठ्या विश्वासाने सामील झाले असून येणाऱ्या काळात तरुणांना सोबत घेऊन लोकसभेतील उमेदवारास निवडून आणण्याचे सगळे प्रयत्न यशस्वी केली जातील असे म्हटले.
माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याबाबत परभणी जिल्ह्यातील एकही शिवसैनिक घरात न बसता रस्त्यावर उतरून परभणीचा खासदार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
लोकसभा प्रमुख मा्जी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा मुळेच देशांमध्ये गोरगरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबविल्या आहेत त्या योजना आपल्या कार्यकर्त्यांनी घरोघर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करण्याचे आवाहन केले तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुतीच्या विचारानेच लढूउ आणि गेल्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास देखील या निमित्ताने दाखवून दिला. येणाऱ्या 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात होणार असून यामध्ये परभणी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यामध्ये हा आनंद उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे.
याप्रसंगी साकोरे, बोर्डीकर,हरिभाऊ लहाने,डॉ.मधुसूदन केंद्रे,मोहनराव फड विटेकर,विजयराव वरपूडकर,आनंदराव भरोसे,प्रताप भैय्या देशमुख,संतोष मुरकुटे,राजेश देशमुख,व्यंकटराव शिंदे,माधवराव कदम,एन.डी.दाभाडे,मधुकर अवचार, डॉ.सुभाष कदम,उमेश देशमुख,विलास बाबर,चंद्रकांत राठोड,दशरथ सूर्यवंशी,साहेब भोसले,अनिल नखाते,विठ्ठल मामा रबदडे,व्यंकटराव तांदळे,विद्याताई चौधरी,सुरेश भुमरे,भागवत बाजगीर, रोहन सामाले,किरण तळेकर,संतोष देशमुख,यासह महायुतीचे सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button