मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू

तुळजापूर: कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आता नियमावली जारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसरात अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्र घालण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. हे नवे नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत. असभ्य आणि अशोभनीय कपडे परिधान करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा मजकूर लिहिलेले फलक मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचा सल्लाही मंदिर प्रशासनाने दिला आहे.

तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर प्रशासनाने ड्रेसकोडबाबत जारी केलेल्या नवे नियम पाळावे लागणार आहेत. या नव्या नियमावलीचे फलक मंदिरात लावण्यात आलेले आहेत. नव्या नियमानुसा बरमोडा, हाफ पँट, उत्तेजक कपडे आणि अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही.

नव्या नियमांनुसार आता मंदिर किंवा मंदिर परिसरात वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट परिधान करून येता येणार नाही. हा नियम जसा मुली, महिलांना लागू आहे, तसाच तो पुरुषांना देखील लागू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ मे या दिवशी मंदिर परिसरात हे फलक लावण्यात आले. या निमित्ताने मंदिर संस्थान प्रशासनाचे व्यवस्थापक सौदागर तांदळे आणि सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा पुजारीवर्गाने सत्कार केला. यावळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

लवकरच होणार मंदिराचा विकास

तुळजाभवनी मंदिराच्या विकासासाठी आता हालचाली सुरू झाल्या असून मंदिर संस्थानच्या नव्या विकास आराखड्याला प्रशाद योजनेतून निधी मिळणार आहे. सुरुवातीचा हा आराखडा १ हजार कोटी रुपयांचा असेल. या आराखड्यात विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, भाविकांचे साहित्य ठेवण्याची सोय आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button