महाराष्ट्र

नाशिकमध्ये माकपच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन

नाशिकमध्ये आदिवासी शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. माकप आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्पळ ठरल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिकच्या मुख्य चौकात चक्काजाम करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक गाड्या अडवत रास्तारोको करताना दिसत आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक आदिवासी शेतकऱ्यांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांच्यासारखे तीव्र आंदोलन आता नाशिकमध्ये करणार, असंही आंदोलकांनी म्हटलं आहे. मोर्चाच्या प्रमुख  पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक होणार आहे, या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेलं किसान सभा आणि माकपचे लाल वादळ अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आमदार जे पी गावित यांनी दिला आहे, सरकार सोबत बोलणी केली. मात्र ,ती बोलणी निषफळ ठरली आहे, अनेक वर्षांपासून त्याच मागण्या केल्या जात आहे, मागील वर्षी मुबंईच्या दिशेनं मोर्चा काढला होता, शहापूर जवळ मोर्चा थांबला, तिथे।सरकारने आश्वासन दिले मात्र ते देखील पाळले नाही, त्यामुळे आता जोपर्यंत अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यं मागे हटणार नाही असा इशारा माजी आमदार जे पी गावित यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.

किसान सभा आंदोलनातील आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. सीबीएस चौकात चक्काकजाम केल्याचं दिसून येत आहे. आंदोलक मोठ्या संख्येने जमले असून पोलीस बळ कमी पडत आहेत. नाशिक शहरातील मुख्य चौक असणाऱ्या सीबीएस चौकात लाला मोर्चातील आंदोलनकर्ते अचानक आल्यानं पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे. आंदोलन कर्त्यांनी रास्ता रोको केल्यानं बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बसमधील प्रवाश्यांना खाली उतरवले जात असून बस पुन्हा माघारी पाठविला जात आहेत, सीबीएस चौकात जाणारे सर्व मार्ग बदलण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

शेतकरी आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालं होतं. शिष्टमंडळात 11 जणांचा सहभाग आहे. विविध मागण्यांसंदर्भात आज विधिमंडळात सरकारसोबत बैठक झाली मात्र, चर्चा निष्फळ ठरली आहे. मंगळवारपासून आदिवासी शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे. आजच्या बैठकीत तोडगा निघला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button