क्राईमपरभणीमुख्य बातमी

उभ्या ट्रकला बसची धडक, दोन जखमी

परभणी : परभणी ते परळी महामार्गावर परभणी पासून जवळच असलेल्या ब्राह्मणगाव येथे सोमवार, दि.२२ मे रोजी रात्री उभ्या ट्रकला बसने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत बसमधील ०२ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी झालेले प्रवाशी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते.

परभणी शहराजवळ असलेल्या ब्राह्मणगाव येथे सोमवार रात्री विटाने भरलेला ट्रक क्रमांक एम.एच.४४ क्यु २७४७ रस्त्यावर उभा होता. या उभ्या ट्रकला बसने धडक दिली. या अपघातात बस क्रमांक एक़एच.२० बी.एल.२९२७ मधील २ प्रवाशी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती परभणी बस आगार प्रमुख यांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button