देश -विदेशमुख्य बातमी

पुन्हा नोटबंदी, २००० हजारांची नोट बंद होणार

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोट ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील, असंही आरबीआयने म्हटलंय.

ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना आरबीआयने केलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.

२३ मे पासून नोटा बदलता येतील

२३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. परंतु एका वेळी केवळ २० हजार रुपयांच्या नोटाच अर्थात १० नोटाच तुम्हाला बदलता येतील.

Advertisements
Advertisements

२०१८-२०१९ मध्येच २ हजारांच्या नोटेची प्रिटिंग थांबविण्यात आली

दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे २०१८-२०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

२ हजार रुपयांच्या नोटा कशा आल्या चलनात?

९ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आश्चर्याचा धक्का देत देशात नोटबंदीची घोषणा केली होती. याअंतर्गत १ हजार आणि ५०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा ५०० रुपयाची नवी नोट आणण्यात आली, मात्र १ हजार रुपयांच्या जागी २ हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठी टीकाही झाली होती. मोठ्या किंमतीच्या नोटा चलनातून बाद करून पुन्हा २ हजार रुपयांची नवी नोट आणल्याने नोटबंदीचा नेमका उद्देश काय होता? असा प्रश्नही तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. तसंच लवकरच ही नोट चलनातून बाद केली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता अखेर रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्णय घेतला असून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button