व्हायरल बातम्या

तेरे जैसा यार कहाँ! कुत्र्याला भेटण्यासाठी मासा पडला पाण्याबाहेर, व्हिडीओचा शेवट पाहून व्हाल अवाक्

आजवर तुम्ही मैत्रीचे कित्येक किस्से ऐकले असतील. एखाद्यानं मित्रासाठी उपवास केला, एखाद्यानं मित्रासाठी पैसे जमा करून गिफ्ट खरेदी केलं, शिक्षणासाठी मदत केली इथपासून अगदी मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला इतपर्यंत. पण तरी देखील आम्ही खात्रीनं सांगतो अशी अनोखी मैत्री तुम्ही कधीच पाहिली नसेल. एक मासा आपल्या लाडक्या मित्राला भेटण्यासाठी चक्क पाण्याच्या बाहेर आला. विश्वास बसत नाहिये? तर मग हा व्हिडीओ पाहा, या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही कुत्र्याचं पिल्लू आणि माशामध्ये असलेली घट्ट मैत्री पाहू शकता. हा मासा पिल्लाची भेट घेण्यासाठी चक्क पाण्याबाहेर आला. त्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली. आणि मग मासा हळूच पुन्हा एकदा पाण्यात शिरला. खरं तर मासा आणि कुत्र्याच्या पिल्लामधील मैत्रीचा कोणी विचारच करू शकत नाही. कारण दोघंही पूर्णत: वेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. तरी दोघांमध्ये घट्ट मैत्री दिसतेय. अन् सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीही न बोलता केवळ हावभावांमधून त्यांना एकमेकांची भाषा कळते.

https://www.instagram.com/p/Cvdi4POh8MJ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Advertisements
Advertisements

अनोख्या मैत्रीचं केलं जातंय कौतुक

हा व्हिडीओ earthdixe या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाख ४४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. तुम्हाला कशी वाटली मासा आणि पिल्लामधील ही मैत्री? आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button