महाराष्ट्रमुख्य बातमी

अवकाळीच्या नुकसानीची माहिती मोबईलवर पाठवा -कृषिमंत्री

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर राज्यात आजही वर्तवलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला आहे. गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

नुकसानीची माहिती देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहेत. बंगला आणि कार्यालयातील मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. अवकाळी, गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती आणि फोटो पाठवण्यात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून 9922204367 आणि 02222876342 हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तुमचं नुकसान झालं असेल तर कृषिमंत्र्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन माहिती द्या असं यावेळी आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

पुढील ३ दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात सलग पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसला आहे.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच पुढील तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button