नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने (नाडा) रविवारी ही कारवाई केली. त्याची माहिती ऍथलेटिक इंटिग्रिटी युनिटला देण्यात आली आहे. निकिता ही शहरातील तिसरी खेळाडू आहे, जिच्यावर डोपिंगविरोधी कारवाई करण्यात आली आहे.
धावपटूच्या लघवीचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली. निकिताने प्रतिबंधित ऍनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्याचे तपासणीत आढळून आले. माहितीनुसार या पदार्थावर इंटरनॅशनल ऍथलेटिक्स फेडरेशनने ३० वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा पदार्थ प्रामुख्याने स्रायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नाडाने रविवारी निकितावर तीन वर्षांची बंदी घातली.
निकिताने गेल्या वर्षी बंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये त्याने ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. प्रतिबंधित द्रवांसंदर्भातील नियमभंगासाठी तिला ही शिक्षा करण्यात आल्याचे ‘एआययू’ने म्हटले आहे. या प्रकरणानंतर डोपिंग चाचणी चर्चेचा विषय ठरली आहे.
Advertisements
Advertisements
Follow Us