क्राईममुख्य बातमी

भानामती केली म्हणून नांदेडमध्ये हत्या!

नांदेड : भानामती केली म्हणून एकाची हत्या करण्यात आली आल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आली. त्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी दोन व्यक्तींना तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील गागलेगाव तालुका बिलोली येथे ही धक्कादायक घटना घडली. येथील हनमंत काशीराम पांचाळ यास तू भानामती केली असे म्हणून काही लोकांनी चिंचेच्या झाडाला बांधले. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये हनमंत काशीराम पांचाळ यांचा मृत्यू झाला. ही घटना १ मार्च रोजी दुुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गागलेगाव तालुका बिलेली येथील हनमंत काशीराम पांचाळ (८५ ) यास तू वामन डुमणे यांच्या मुलीवर कर्णी, भानामती केली, असा आरोप करण्यात आला. रत्नदीप वामन डुमणे, वामन डुमणे रा. गागलेगाव व दयानंद वाघमारे रा. कागंठी या तिघांनी संगनमत करून त्यांच्याच घरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडाला पांचाळ यास बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये पांचाळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारोती नागनाथ पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वामन डुमणे, रत्नदीप वामन डुमणे, आणि दयानंद वाघमारे या तिघांविरुद्ध रामतीर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

सदरील घटनेतील तीन आरोपीपैकी वामन डुमणे व दयानंद वाघमारे या दोघांना रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रत्नदीप वामन डुमणे यांचा पोलीस शोध घेत आहेत. हनमंत काशीराम पांचाळ यांचे बिलोली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गागलेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button