व्हायरल बातम्याव्हिडिओ न्यूज

६३ वर्षानंतर शाळेतल्या प्रेयसीला केलं प्रपोज, ७८ वर्षांच्या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल

शाळेत असताना आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडलाच असेल. आता काही जण त्याला बालपणीचं वेड म्हणतील किंवा काही जण क्रश म्हणतील. पण त्या व्यक्तीबद्दल एक वेगळीच प्रेमळ भावना आपल्या मनात असते. आज तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुमचं लग्न वगैरे झालं असेल, पण पहिलं प्रेम म्हणताच नकळत तो शाळेतला व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतो. अर्थात अनेकांनी आपलं हे प्रेम कधीच व्यक्त केलं नसेल. पण जर का तुम्हाला ते प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली तर काय होईल? होय, असाच काहीसा प्रकार ७८ वर्षांच्या एका आजोबांसोबत घडला आहे. त्यांना तब्बल ६३ वर्षांनंतर आपल्या बालपणीच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची संधी मिळाली. अन् त्यांनी देखील ती संधी न गमावता जणू शाहरूखच्या शैलीत आपलं प्रेम व्यक्त केलं. या मजनू आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

https://www.instagram.com/p/CuUdvPExVb-/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

कशी झाली पुन्हा भेट?

ही लव्हस्टोरी आहे अमेरिकेत राहणारे ७८ वर्षांचे थॉमस मॅकमीकिन आणि नॅन्सी गेम्बेल यांची. ६० च्या दशकात शाळेत असताना ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांचं नातं मैत्रीपलिकडे कधी गेलंच नाही. दोघांपैकी कोणीच आपलं प्रेम व्यक्त केलं नाही. परिणामी पाहता पाहाता शालेय दिवस संपले अन् पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते दोघं विविध शहरांमध्ये गेले. दरम्यान दोघांचा पत्रव्यवहार सुरू होता. पण मग नोकरी वगैरे सुरू झाल्यानंतर तो देखील बंद झाला. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यात हळूहळू हरवून गेले. पुढे दोघांचंही लग्न झालं. मुलं बाळ झाली. आयुष्य पुढे जात राहिलं. पण तेवढ्यात शाळेच्या ग्रुपनं एका रियुनियन पार्टी आयोजित केली होती. अन् या पार्टीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांची भेट झाली.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button