महाराष्ट्र

भल्यापहाटे भीषण अपघात; भरधाव एसटी बसची कंटेनरला धडक, बस चक्काचूर

ठाणे : बुलढाणा येथे सिंदखेडराजाजवळ काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात २५ जणांचा करुण अंत झाला होता. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर गावाजवळ देखील काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात देखील १० जणांचा मृत्यू झाला. राज्यात अपघातांचं सत्र हे सुरुच आहे. याचदरम्यान, आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एसटी बस आणि कंटेनरचा भयानक अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, सदर अपघातामध्ये एका महिलेला आणि एसटी वाहक यांना दुखापत झाल्याने त्यांना उपचाराकरता छ.शि.म. रुग्णालय, कळवा, ठाणे येथे दाखल केले आहे. तसेच इतर प्रवासी सुखरूप असल्याने ते घटनास्थळावरून आपापल्या घरी मार्गस्थ झाले आहेत.

आज पहाटे सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास जुपिटर हॉस्पिटल समोर, लक्ष्मी- चिराग नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे एसटी क्रमांक MH 14 BT 4489 (चालक- श्री. संदीप पाटील, वय- ३७ वर्षे, वाहक- श्री. अमर परब, वय – ३८ वर्षे.) हे वाहन ठाणे एसटी बस डेपो येथून बोरवलीला जात होते. त्याचदरम्यान, समोर चालत असलेल्या अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर क्रमांक MH 04 KF 4146 या वाहनाला मागून धडक दिल्याने अपघात झाला. एसटी बसमध्ये एकूण ९ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४ महिला आणि ५ पुरुष होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, यात एसटी बसचा समोरचा भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदर ठिकाणची वाहतूक एका लेन वरून धिम्या गतीने सुरू होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी कापूरबावडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२-पिकअप वाहनासह उपस्थित होते.

सदर अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली असून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस यांच्याकडून करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button