महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

बच्चू कडू आंतरवालीत तळ ठोकून; सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची घेतली जबाबदारी

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम असून, तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. अशातच आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन संवाद साधला आहे. तसेच यापुढे देखील सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहे.

मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच, आंतरवाली सराटी गावात देखील नेत्यांना येण्यास आंदोलकांकडून मनाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जरांगे यांनी एक पाऊल मागे घेत आपण एकदा सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, आमदार बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी बुधवारी जरांगे यांची आंतरवालीत जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. तर, जरांगे यांनी पाणी घेण्याची विनंती यावेळी कडू यांनी केली. मात्र, जरांगे यांनी याला नकार दिला. दरम्यान, यापुढील आंदोलक आणि सरकारमध्ये संवाद घडवून आणण्याचे काम बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, आज दुपारपर्यंत बच्चू कडू अंतरवाली सराटी येथे शिष्टमंडळ पोहोचण्यापूर्वी पोहचणार आहे. तसेच, आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहे.

सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार…

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी एक पाऊल मागे घेऊन आपण सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज सरकारचे एक शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची चर्चा करणार आहे. यावेळी सरकारची भूमिका आणि आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न याची माहिती हे शिष्टमंडळ जरांगे यांना देणार आहे. सोबतच काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती सुद्धा यावेळी दिली जाईल. यासोबतच राज्यात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती देखील यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button