व्हायरल बातम्या

६ वर्षांच्या चिमुकल्यानं घेतला सर्वात विषारी सापाशी पंगा, शेपटी पकडून खेचलं, पण तेवढ्यात…

साप दिसताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. लोक भितीनं वाट मिळेल तिथे पळू लागतात. अन् त्यामध्ये जर का किंग कोब्रा असेल तर मग काय विचारायलाच नको. कारण कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या एका दंशानं सुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण या अत्यंत विषारी सापाशी चक्क एका ६ वर्षांच्या चिमुकल्यानं पंगा घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे एखाद्या खेळण्यासोबत खेळावं तसं हा मुलगा सापाची शेपटी ओढून त्याच्यासोबत खेळत आहे. पण शेवटी खराखुरा सापच तो, मुलानं शेपटी ओढताच सापानं काय केलं हे आता तुम्हीच पाहा.

या मुलानं सापाला कसं केलं नियंत्रित

हा व्हिडीओ @ns_subhash या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही ६ वर्षांच्या एका मुलाला चक्क एका किंग कोब्रासोबत खेळताना पाहू शकता. हा साप किमान ८ ते १० फुट लांब आहे. यावरूनत किती अनुभवी शिकारी असेल याच अंदाज येईल. पण हा मुलगा चक्क एखाद्या पाळीव प्राण्यासोबत खेळावं तसं या सापासोबत खेळतोय. मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ उत्तराखंड येथील आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी मात्र चांगलेच खवळले आहेत. कारण या सापाचा एक साधा दंश सुद्धा माणसाचा जीव घेऊ शकतो. अन् या मुलाचे पालक त्याला इतक्या विषारी सापासोबत खेळू देत आहेत. दरम्यान काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुक देखील केलंय. कदाचित हा साप पाळिव असावा किंवा त्याचं विष काढून टाकण्यात आलं असावं. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button