गंगाखेडपरभणीव्हायरल बातम्या

तीन अनाथ सख्ख्या भावाची पोलिस दलात निवड

परभणी : परभणी जिल्ह्यातील कृष्णा, आकार आणि ओंकार शिसोदे यांच्या या यशाने बालगृहात राहणाऱ्या अनाथ मुलांनाही  मेहनत, हुशारीने आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जाताना मुलांनी मिळेल ते काम करून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. या प्रवासात महिला बालविकास विभागानेही साथ दिली. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात तीन सख्ख्या अनाथ भावंडांनी थेट पोलिस दलात मजल मारली.

कृष्णा आणि आकार यांची मुंबई पोलिस आणि ओंकार याची परभणी पोलिस दलात निवड झाली आहे. शिसोदे कुटुंब परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी गावाचे. आई-वडिलांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आणि ही मुले बालपणीच अनाथ झाली. जेमतेम एक एकर जमीन आणि घर. या तिघांतील सर्वांत मोठ्या भावाने आकाशने भावांची जबाबदारी उचलली. भावंडांसाठी आकाशने शिक्षण सोडले आणि साखर कारखान्यावर काम सुरू केले. पण भावांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. म्हणून लहाने कृष्णा, आकार आणि ओंकार परभणी जिल्ह्यातीलच सागर बालगृहात राहायचे. सन २०१५मध्ये बालगृह बंद झाले. त्यानंतर या मुलांना परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संस्थेत आश्रय मिळाला. संस्थेचे नितीन लोहट यांनी त्यांना मदत केली. नंतर कृष्णा मित्रांच्या खोलीवर राहायचा.

Advertisements
Advertisements

पुण्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी कांबळे यांनी शिफारस केल्यावर पुणे विभागीय कार्यालयाने तिघांना अनाथ प्रमाणपत्र दिले. तिघेही आता इतर अनाथ मुलांना मार्गदर्शन करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button