देश -विदेशमहाराष्ट्रराजकारण

मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत.

कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने हिंदुजा रुग्णलायात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत चिंताजनक आहे. हिंदुजा हॅास्पिटलमधील डॅाक्टरांनी पुढील २४ तास मनोहर जोशी यांच्या तब्येतीसाठी महत्वाचे असल्याचं सांगितले आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीडचे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. त M.A. L.L.B झाले होते. M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली.

Advertisements
Advertisements

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button