महाराष्ट्रमुख्य बातमी

नांदेडमध्ये तृतीयपंथीय भीमाशंकरने दिली तलाठीची परीक्षा

तृतीयपथी असल्यामुळे अनेकजण कामाला ठेवत नाहीत, नोकरी मिळत नाही, मग जगण्यासाठी भीक मागावी लागते. पण भीक मागून जगण्यापेक्षा सन्मानानं जगता यावं यासाठी नांदेडमधील तृतीयपंथी भीमाशंकर कांबळे यांने तलाठीची परीक्षा दिली आहे.

भीमाशंकर कांबळे (वय 29) हा मूळ लोहा तालुक्यातील किवळा येथील रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अशा परिस्थितीत त्याने किवळा येथे दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नांदेड  शहरात  बारावी आणि नंतर मुक्त विद्यापिठातून पदवी प्राप्त केली. टाइपिंग, टॅली, एमएस सीआयटी देखील पूर्ण केलं आहे. दरम्यान शिक्षण पूर्ण करत असताना त्याला अनेक नाहक त्रास सहन करावा लागला. तृतीयपंथी असल्याने समाजाने त्याला हिणवलं. एवढचं नाही तर घरच्यानी भीमाशंकर याला हाकलून लावले होते.

मागील सहा वर्षापासून भीमाशंकर हा  हडको  येथे राहतो. सुरुवातीला रस्त्यावर टाळ्या वाजवून भीक मागायची. कोणी पैसे देत होते तर कोणी पैसे देत नव्हते. लोकांचे बोलणे देखील खावं लागत होते. त्यामुळे आपल्याला मोठा अधिकारी बनायचं आहे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.  भीमाशंकर याने तलाठीची परीक्षा दिली आहे. आपल्यासारखं इतरांनी देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावे असा संदेश भीमाशंकर याने दिला आहे.

Advertisements
Advertisements

तलाठी भरती घोटाळ्यातील आरोपीला अटक

नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत उघडकीस आलेल्या गैरप्रकारानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. हायटेक कॉपी प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गणेश गुसिंगेला म्हसरुळ पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकीटॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि श्रवणयंत्र असे साहित्य हस्तगत केले होते. त्याच्या मोबाईलमध्ये तलाठी पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचे फोटोही आढळून आले होते. दरम्यान याप्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश असलेल्या विशेष पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपासबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

दरम्यान मंगळवारी न्यायालयात  सरकारी पक्षाने आपली बाजू मांडताना गणेशचे आणखी तीन साथीदार असून शहर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. त्याने वनरक्षक परीक्षेत परीक्षार्थींना मदत केली असावी असा आम्हाला संशय आहे. विशेष म्हणजे त्याचा मोबाईल रिसेट असल्याने गोपनीय माहितीही मिळू शकलेली नाही. तसेच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असू शकते, त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. तर बचाव पक्षाने गणेश गुसिंगे बहिणीला तलाठी परीक्षेसाठी घेऊन आला होता.

पोलिसांच्या तपासात प्रगती नसून बहीण परीक्षेचा अभ्यास करत असल्याने अभ्यासासंदर्भात माहिती मोबाईलमध्ये होती असे म्हटले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपी गणेश गुसिंगेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान तीन दिवसात नाशिक पोलीस कसा तपास करतायत याकडे आता लाखो परीक्षार्थींचं लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button