महाराष्ट्रमुख्य बातमी

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा, कोव्हिड सेंटर घोटाळ्याचा आरोप

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप पेडणकरांवर केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने उद्धव ठाकरे गटासाठी मोठी धक्का मानला जात आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोव्हिड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडे करण्यात आली होती. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोव्हिड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडे करण्यात आली होती. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

ईडीने २१ जून रोजी विविध ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास १५० कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय १५ कोटींच्या एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. २१ जूनला ईडीने केलेल्या छापेमारीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १५ जणांचा समावेश होता.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button