महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले…उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर गंभीर टीका

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी शिंदे या जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे.

माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Advertisements
Advertisements
काय म्हणाले उद्धव ठाकरे?

एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही.

यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही.

त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही.

फडणवीसांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये.

एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं”, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा करत शिंदे गटाच्या काही महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना रविवारी समज देण्याचा प्रयत्न केला. हे ही चर्चा विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये धक्काबुक्की सुरू झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

यानंतर रोशनी शिंदे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची आज उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button