महाराष्ट्रमुख्य बातमी

LIVE UPDATE ON MAHARASHTRA राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी बोलावणं बेकायदेशीर

  • 12:22 PM,May 11 2023
    नबाम रेबिया प्रकरणाचा विषय मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात येत आहे – सुप्रीम कोर्टाचा निर्णय

  • 12:21 PM,May 11 2023
    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता – सुप्रीम कोर्ट

  • 12:18 PM,May 11 2023
    तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घटनापीठाचे ताशेरे, कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही, घटनापीठाचे गंभीर निरीक्षण

  • 12:16 PM,May 11 2023
    महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वासाचा प्रस्तावही दिला नव्हता, उद्धव ठाकरे सरकारने विश्वास गमावला आहे की नाही, हे राज्यपालांनी आधी तपासायला हवे होते – सुप्रीम कोर्ट

  • 12:16 PM,May 11 2023
    राज्यपालांपुढं बहुमत चाचणी बोलावण्यासारखी वस्तुनिष्ठ स्थिती नव्हती : सुप्रीम कोर्ट

  • 12:10 PM,May 11 2023
    शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आणि दोन व्हिप असताना विधानसभाध्यक्षांनी चौकशी करणे गरजेचे होते, पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हिप आहे, हे विधानसभाध्यक्षांनी तपासायला हवे होते, घटनापीठाचे महत्त्वाचे निरीक्षण

  • 12:08 PM,May 11 2023
    एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भरत गोगावले यांना व्हिप म्हणून विधानसभाध्यक्षांनी मान्यता देणे बेकायदेशीर – सुप्रीम कोर्टाचा निर्णय

  • 12:00 PM,May 11 2023
    महाराष्ट्राच्या निमित्ताने नबाम रेबिया प्रकरणाचा विषय आणखी मोठ्या पीठाकडे जाणार. घटनापीठाचा निर्णय…

  • 11:59 AM,May 11 2023
    Maharashtra Political Crisis : नबाम रेबियाचं प्रकरण मोठ्या बेंचकडे जाणार

  • 11:58 AM,May 11 2023
    सरन्यायाधीशांकडून सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button