व्हायरल बातम्याव्हिडिओ न्यूज

‘तुझ्या बायकोपेक्षा मी बरी’, कुत्र्यासाठी मालकिणीनं गरोदर महिलेसोबत केला तुफान राडा,

अनेकांना घरात कुत्रे पाळण्याची आवड असते. पण पाळीव प्राण्यांचा सांभाळ करणं ही देखील एक मोठी जबाबदारी असते. एखाद्या लहान बाळाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण ते कधी कोणावर हल्ला करतील सांगता येत नाही. इमारतीतल्या रहिवाशांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे असे व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एक महिला आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरली. पण या कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये उभं राहायला इतर लोकांना मात्र भिती वाटतेय. परिणामी त्याचं तोंड मास्क लावून बंद करावं अशी विनंती कुत्र्याच्या मालकिणीला करण्यात आली. पण ही गोष्ट मालकिणीला काही आवडली नाही. परिणामी तिनं जोरदार भांडण केलं. या भांडणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं तरी काय?

तर त्याचं घडलं असं की एक महिला आपल्या कुत्र्याला घेऊन लिफ्टमध्ये शिरली. पण या कुत्र्यासोबत उभं राहणं लोकांना भितीदायक वाटतंय. कारण अलिकडेच एका पाळीव कुत्र्यानं लहान मुलाला चावल्याची घटना समोर आली होती. परिणामी त्या कुत्र्याला मास्क लावण्याची विनंती करण्यात आली. पण मालकिण काही मास्क लावण्यास तयार नाही. लक्षवेधी बाब म्हणजे मास्क कुत्र्याच्या गळ्यातच आहे. मात्र तरी देखील मालकिण मात्र भांडण करण्यात व्यस्त दिसतेय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सांगतोय की त्याची बायको गरोदर आहे. जर हा कुत्रा चावला तर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृपया तुम्ही आपल्या कुत्र्याच्या तोंडाला मास्क लावा. पण ती मालकिण काही तयार नाही. उलट तुमच्यासारखेच लोक कुत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल करतात असं ती प्रत्युत्तर देत आहे. शिवाय तुझ्या बायकोपेक्षा मी बरी, असा उपरोधिक टोला देखील मारतेय. ही घटनेचा व्हिडीओ आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या कुत्र्याच्या मालकिणी विरोधात संताप व्यक्त केलाय. तिच्याविरधात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील काहींनी केलीये.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button