ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्र

गंगाखेड पोलीस उपविभाग मराठवाड्यात प्रथम !

१०० दिवस सुधारणा कार्यक्रमात घेतला होता सहभाग

  1. गंगाखेड : महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीम उपक्रमात गंगाखेड उपविभागीने पहिला नंबर काढला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांचेसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात माहे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान राबविण्यात आलेल्या 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम उपक्रमात वेगवेगळ्या मुद्द्यांवर सामान्य जनतेस सेवा पुरविण्याच्या उद्देशाने या विशेष मोहिमे अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये जनसेवेसाठी कामकाजात सुधारणा आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. या विशेष मोहिमे अंतर्गत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी कार्यालयात तसेच गंगाखेड उपविभागातील गंगाखेड, सोनपेठ, पिंपळदरी पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्थेसंबंधी जनतेला विविध सेवा पुरविण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण दिनानिमित्त तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन करून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढली.

आपले सरकार पोर्टलवर (Portal)प्राप्त ऑनलाईन तक्रारींचे ठराविक कालावधीत निरसन करणे, डायल 112 सुविधेची पिडीतांना कमीत कमी वेळेत सेवा पुरविणे, अर्जदारांची चारित्र्य पडताळणी प्रकरणे मुदतीत निकाली काढणे, पोलीस ठाणे स्तरावरील मुद्देमाल निर्गती करणे, तक्रारदारांसाठी स्वागत कक्ष, अभ्यंगत कक्ष, तक्रार निवारण कक्ष, स्वच्छ कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनतेच्या सोयीसाठी कार्यालयात व्यवस्थित नामफलक लावून घेणे अशा विविध कार्यालयीन सोयी सुविधा पुरविणे, कार्यालयातील अभिलेखाचे वर्गीकरण करून कालबाह्य झालेले अभिलेख नष्ट करणे, गाव पातळीवरील सुरक्षिततेत भर टाकण्यासाठी सि-नेत्र सारखा उपक्रम राबवून लोक सहभागातून गंगाखेड उपविभागातील कार्यक्षेत्रातील गावांमध्ये एकूण 270 कॅमेरे बसविणे, एक संवाद विद्यार्थिनींशी या उपक्रमांतर्गत कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आदी ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांना महिला व बालकांवरील अत्याचारांचे कायदे, नवीन कायदे, डायल 112, स्वसंरक्षण, गुड टच- बॅड टच अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणे, नवीन कायद्यांचा जनतेत प्रसार करणे, पोलीस पाटील, व्यापारी, शांतता समिती सदस्यांसह कामगारांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडी अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करणे आदी विविध कामे जनतेला सेवा पुरविण्याच्या दृष्टीने करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजी नगर मराठवाडा विभागात पोलीस विभागातील तालुकास्तरीय कार्यालयांत महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम उपक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेले कार्यालय म्हणून गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button