‘त्या’ अध्यादेशाविरोधात गंगाखेडला होणार अखंड धरणे आंदोलन
सकल ओबीसींचे तहसीलदारांना निवेदन

गंगाखेड :
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ते ओबीसीतून असू नये अशी मागणी आज गंगाखेड ओबीसींच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देत तहसीलच्या प्रांगणात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, ओबीसी हिताच्या विविध मागण्यांसाठी तहसील समोर अखंड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मराठा समाजातील झुंडशाहीसमोर नमते घेत राज्य सरकार राज्य घटनेशी विसंगत निर्णय घेईल, अशी भिती ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. सरकारने असा काही निर्णय घेवून ओबीसीचे आरक्षण संपवू नये, यासाठी लढा देण्याचा निर्णय ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, ॲड. मंगेश ससाने यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. यास अनुसरून आज गंगाखेड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मराठा समाजास ओबीसीतून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, मागील दोन वर्षांत वाटप करण्यात आलेले बोगस कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावेत आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या प्रसंगी ओबीसी समन्वय समितीचे गोविंद लटपटे, गोविंद यादव, बालाजी मुंडे, गोविंद मानवतकर, ॲड साधना राठोड, सुरेश बंडगर, मनोज मुरकुटे, रामेश्वर भोळे, बालासाहेब पारवे, संदिप केंद्रे, लक्ष्मण लटपटे, योगेश फड, केशव लटपटे, धीरज मुंडे, सागर गोरे, अशोक मुंडे, केशव लटपटे, डिगंबर यादव, गजानन देवकते, अरूण मुंडे, विनायक सोन्नर, ॲड डी. टी. मुंडे, सतिष पोले, श्रीमंत नागरगोजे, नारायण परकड, भगीरथ फड, रमेश खांडेकर, अनिल गोरे, रखमाजी तेलंग, प्रदीप फड, नरसींग लटपटे आदिंसह बहुसंख्य ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

