ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्र

गंगाखेडला ‘साई सेवा’ च्या दसरा महोत्सवाची तयारी सुरू

सोमाणी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

गंगाखेड : येथील श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाणाऱ्या दसरा महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. आतिषबाजीसह अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अपप्रवृत्ती पुतळा बनवण्याच्या कामाचे  ऊद्घाटन करण्यात आले.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गंगाखेडच्या दसरा महोत्सवात आतिषबाजी, पुतळा दहन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत. यावर्षीही हा सोहळा येत्या दोन ऑक्टोबर रोजी ऊत्साहात साजरा केला जाणार आहे. आज संपन्न झालेल्या ऊद्घाटन कार्यक्रमास साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक गोविंद यादव, प्रकाश घन, प्रा. संग्राम मुंडे, रमेश औसेकर, संजयलाला अनावडे, गुंडेराव देशपांडे, गजानन महाजन, मनोज नाव्हेकर, प्रा. सुहास देशमाने, संदीप कोटलवार, भगत सुरवसे, बालासाहेब यादव, विष्णू अनावडे, नंदकिशोर सोमाणी, अमित राजेंद्र, संजय सोनटक्के, डिगंबर यादव, रमेश शिंगणे, व्यंकटेश यादव, गंगाराममामा शंकुवाड, पुतळा कलाकार विठ्ठल परडे, बालाजी परडे यांचेसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button