ताज्या बातम्यादेश -विदेशमहाराष्ट्र

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

२५ वर्षांनी भेटले सवंगडी

हडपसर :
येथील जिल्हा परिषद प्रशालेचे माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी एकत्र आले. स्नेह मेळाव्या निमित्ताने भेटलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर साडेसतरा नळी हडपसर येथे सन १९९५ ते २००० या काळातील इयत्ता पहिली ते सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यात बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तत्कालीन शिक्षिका खरात मॅडम, पुस्तके मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर आदिंसह विद्यार्थ्यांनी शाळेचे जुने दिवस अनुभवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button