ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्र

युवकांनी शिक्षणाबरोबरच आत्मनिर्भर व्हावे

सेवा योजन शिबिरात प्रा. डॉ. आंधळे यांचे प्रतिपादन

गंगाखेड :

येथील कै सौ शेषाबाई सीताराम मुंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मौजे कासारवाडी येथे विशेष शिबिराची सांगता आज करण्यात आली. या शिबिरात दि 24 फेब्रुवारी 02 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

इतर कार्यक्रमांसोबतच या शिबिरात ग्रामीण भागातील महिलांना शिवणकला प्रशिक्षणाचेही मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबीर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणकारी व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवाभाव रुजवण्यासाठी व बौद्धिक सांस्कृतिक शैक्षणिक व विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन व तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. वाचन चावडी, डिजिटल लिटरसी, स्कुल कनेक्ट इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. या शिबिराचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे तसेच कासारवाडी गावच्या सरपंच मा सौ. सुनिता बबनराव गुट्टे, बबन तुकाराम गुट्टे, संजय मुसळे, मुरलीधर मुंढे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार मंडळ, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ किरण पिनाटे व कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ अशोक केंद्रे यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे यांनी आजच्या तरुण पिढीने शिक्षण घेत असतानाच स्वतःला आत्मनिर्भर कसे होता येईल या साठी सातत्याने प्रयत्न करावा. केवळ डिग्री घेऊन आज उपयोगाचे नाही तर डिग्री सोबतच तरुणांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे आणि कुटुंबाचा व देशाचा आधार बनले पाहिजे असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी शिक्षणासोबतच शेती पूरक उधोग करावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवा व नव राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला विद्यार्थ्यांनी स्वतःला समर्पित करावे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा श्री संजय मुसळे, मा श्री बबनराव गुट्टे, महाविद्यालयातील प्रा डॉ बबन गित्ते, प्रा नामदेव लटपटे, प्रा डॉ लहू फड, प्रा सिद्धार्थ शिंदे व श्री रघुनाथ चव्हाण यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विठ्ठल टेकाळे, प्रास्ताविक प्रा डॉ अशोक केंद्रे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा डॉ राजीव आहेरकर यांनी उपस्थित व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button