महाराष्ट्रराजकारण

कलंकीचा कावीळ! फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

नागपूरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना “नागपूरचा कलंक’ असं संबोधलं होतं. त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत फडणवीसांनी ठाकरेंना ‘कलंकीचा कावीळ’ असं संबोधलं आहे.

फडणवीसांनी ट्विट करताना, कलंकीचा काविळ असा मथला देताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या ठाकरेंना आठ वाक्यांतून निशाणा साधला आहे. तसेच यापूर्वी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकांच्या व्हिडिओ क्लीप्स समोर आणल्या आहेत.

फडणवीसांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!

Advertisements
Advertisements

2) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलेलं जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!

3) सकाळ, दुपार, संध्याकाळ सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!

4) सकाळी सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या रात्री गळ्यात गळे घालणे, याला म्हणतात कलंक!

5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना वसुलीला लावणं, याला म्हणतात कलंक!

6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का? असे विचारणे, याला म्हणतात कलंक!

7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!

8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा कावीळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button