राजकारण

महायुतीच्या मेळाव्यांसाठी ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ जाहीर, परभणीतून राजेश विटेकर फायनल

मुंबई दि. ७ जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा समन्वय प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे.

१४ जानेवारी रोजी या मेळाव्यांमध्ये महायुतीतील सर्व घटकपक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत तसेच संबंधित जिल्ह्यांचे  पालकमंत्री आणि मंत्री महोदय उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा मेळाव्यासाठी जिल्हा समन्वय प्रमुखांची यादी खालीलप्रमाणे – मुंबई शहर व मुंबई उपनगर – मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, पालघर – जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, ठाणे – जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, रायगड – आमदार अनिकेत तटकरे, रत्नागिरी – आमदार शेखर निकम, सिंधुदूर्ग – जिल्हाध्यक्ष आबिद नाईक, पुणे – प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, सातारा – आमदार मकरंद पाटील, सांगली – जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, कोल्हापूर – माजी आमदार के. पी. पाटील, सोलापूर – आमदार यशवंत माने, धाराशिव – प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, लातूर – आमदार बाबासाहेब पाटील, बीड – माजी आमदार अमरसिंह पंडित, नांदेड – आमदार विक्रम काळे, परभणी – माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, हिंगोली – आमदार राजू नवघरे, जालना – जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, छत्रपती संभाजीनगर – आमदार सतीश चव्हाण, बुलढाणा – माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, वाशीम – जिल्हाध्यक्ष युसूफ पुजारी, अकोला – आमदार अमोल मिटकरी, अमरावती – प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, वर्धा – माजी मंत्री सुबोध मोहिते, नागपूर – गोंदिया – माजी आमदार राजेंद्र जैन, यवतमाळ – आमदार इंद्रनील नाईक, भंडारा – सरचिटणीस धनंजय दलाल, गडचिरोली – जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, चंद्रपूर – जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, नाशिक – आमदार दिलीप बनकर, अहमदनगर – आमदार संग्राम जगताप, धुळे – सरचिटणीस किरण शिंदे, जळगाव – जिल्हाध्यक्ष संजय पवार, नंदुरबार – जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आदी.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button