गंगाखेड

साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज यशवंतांचा गौरव समारंभ*

एमपीएससी चे यशवंत करणार मार्गदर्शन

गंगाखेड : एमपीएससीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात गंगाखेड आणि पालम तालुक्यातील गुणवंतांनी यश संपादन केले आहे. यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व विस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या यशवंतांचा आज गंगाखेड येथे गौरव केला जाणार आहे. साई सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गंगाखेड येथील संत सावता माळी मंदिरात हा कार्यक्रम ऊद्या दि. २६ जानेवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न होईल. बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून ऊपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पोलीस ऊपअधिक्षक दिलीप टीपरसे यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. ऊपजिल्हाधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या सुपा ( ता. गंगाखेड ) येथील मुळ रहिवाशी कु. शितल बालासाहेब घोलप, तहसीलदार पदासाठी पात्र ठरलेले गौंडगाव ( ता. गंगाखेड ) येथील विकास कुकडे, वीस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरलेले पालम येथील विशाल सुरवसे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील यशवंत डॉ. नीलेश नोमाजी गोरे, डॉ. प्रतिक्षा विनोद गुरसाळी ( गंगाखेड ), डॉ. ऋतुराज रघुराज गाडगीळ ( पेठशिवणी ), भारत प्रकाश शिंदे ( मरडसगाव), संकेत महारूद्र ईदाते, ओंकार व्यंकटेश पालदेवार, अंकीता गणेश औटी, प्रियंका धोंडीराम जाधव, स्नेहा राजेभाऊ यादव ( गंगाखेड ), अनुष्का सुरेश जंपनगीरे ( खडी, ता. पालम ) यांचाही याप्रसंगी गौरव केला जाणार आहे.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने ऊपस्थित रहावे, असे आवाहन साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर, बालासाहेब यादव, संयोजक सागर गोरे, डिगंबर यादव, पसराम गिराम, रंजीत शिंदे आदिंच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button