गंगाखेड

भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी अत्यंत आक्रमक होत गंगाखेड आमदारांवर सोडले जहरी टिकास्त्र..

परभणी
विशेष
हनुमंत चिटणीस

भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर अत्यंत आक्रमकपणे जोरदार टीकास्त्र सोडले.

गंगाखेडच्या लोकप्रतिनिधीची दादागिरी आता उलथून टाकण्यासाठी आपण स्वतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार असून गोरगरीब आणि जनतेसाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करणार अशी ठाम भूमिका मांडली.

Advertisements
Advertisements

गेल्या चार वर्षात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही कामांना गती मिळाली नाही विकास कामे झाले नाहीत लोकप्रतिनिधींनी केवळ दादागिरी आणि दडपशाही केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला
गेल्या चार वर्षात गंगाखेडच्या आमदारांनी जनते ची कामे केली नाहीत उलट त्यांच्या विरोधातील किंबहुना माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये मोठे षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला
माझे राजकीय आणि कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करण्यासाठी त्यांनी विडा उचलला परंतु मी प्रामाणिक असल्यामुळे त्यांचे मनस्वी उधळले गेले मला तुरुंगात टाकण्याची त्यांनी सगळी तयारी देखील केली होती परंतु माझे नाणे खणखणीत असल्यामुळे काहीही वाकडे होऊ शकले नाही

गंगाखेडची जनता माझ्या सदैव पाठीशी असून आपण केवळ समाजसेवा करण्यासाठी राजकारणात सहभाग नोंदवला असल्याचं त्यांनी सांगितलं एवढेच नव्हे तर राजकारणात आपण कधीही पैसा कमावला नाही कमवायचा ही नाही

जनतेची सेवा मला करायची आहे यावर त्यांनी भर दिला

संतोष मुरकुटे यांच्या अभिष्टचिंतनासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठा संख्येने उपस्थित होते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर डॉक्टर विद्या चौधरी, भाई मुंडे, रामप्रभू मुंडे भगवान सानप विठ्ठलराव अरबदडे डॉक्टर सुभाष कदम गोविंद यादव डॉक्टर भालेराव मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button