गंगाखेड

न्याय्य कामांतून मिळवलेला आनंद ही अमुल्य संपत्ती – डॉ. टिपरसे

साईसेवा प्रतिष्ठाण कडून यशवंतांचा गौरव

गंगाखेड : विद्यार्थ्यांनी गुणवंत, यशवंत झालं पाहिजे. यामुळेच आपल्या आई-वडीलांच्या चेहरऱ्यावर वेगळं समाधान फुलतं. आपल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान हे जगातील सर्वोच्च पुरस्कार, आणि सगळ्यात मोठं बक्षीस असतं. आपल्या मातापित्यांना असं समाधान मीळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन गंगाखेडचे पोलिस ऊपअधिक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी केले.

श्री साईसेवा प्रतिष्ठाणच्या वतीने एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या यशवंतांचा पालकांसह गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते बाळकाका चौधरी हे होते. मंचावर जेष्ठ पत्रकार सुरेश जंपनगीरे, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, नागेश पैठणकर, हाजी गफार शेख, दत्तारामजी शिंदे, मुंजाभाऊ लांडे, बालासाहेब शिंदे सर, बालासाहेब घोलप, चक्रधर शिंदे, आदिंची ऊपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. टिपरसे यांनी यशवंतांसह ऊपस्थित विद्यार्थी आणि पालकांनाही मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशासकीय काम करत असताना एखाद्या व्यक्तीस मीळवून दिलेला न्याय हे अमुल्य समाधान असते. या आनंद आणि समाधानाची बरोबरी आपल्याकडे असलेल्या करोडो रुपयांची संपत्तीही करू शकत नाही. म्हणून भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने कार्य करावे, असे आवाहन टिपरसे यांनी केले. मिळालेल्या यशावर समाधान मानून न थांबता यशाची पुढची पायरी चढण्यासाठी गुणवंतांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे मत यावेळी बोलताना बाळकाका चौधरी यांनी व्यक्त केले.

Advertisements
Advertisements

ऊपजिल्हाधिकारी पात्र कु. शितल बालासाहेब घोलप, तहसीलदार पदासाठी पात्र ठरलेले विकास कुकडे, विस्तार अधिकारी पदासाठी पात्र विशाल सुरवसे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील यशवंत डॉ. नीलेश नोमाजी गोरे, डॉ. प्रतिक्षा विनोद गुरसाळी डॉ. ऋतुराज रघुराज गाडगीळ, भारत प्रकाश शिंदे संकेत महारूद्र ईदाते, ओंकार व्यंकटेश पालदेवार, अंकीता रूद्रकंठवार, डॉ. कलींदर, अंकीता गणेश औटी, प्रियंका धोंडीराम जाधव, स्नेहा राजेभाऊ यादव, अनुष्का सुरेश जंपनगीरे, सुजाता संजय सोनटक्के या यशवंतांचा या प्रसंगी पालकांसह सन्मान करण्यात आला. नियोजनातून सातत्यपूर्ण अभ्यास हे यशाचे गमक असल्याचे यावेळी बोलताना शितल घोलप, विकास कुकडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. सुत्रसंचालन मनोज नाव्हेकर, दुर्गादास गिराम यांनी तर आभार प्रदर्शन बालासाहेब पारवे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत गजानन महाजन, आबासाहेब शिंदे, रमेश औसेकर, बालासाहेब यादव, सुधाकर गोरे, कारभारी निरस, पंकज भंडारी, संदीप कोटलवार, नंदकिशोर सोमाणी, शाम कुलकर्णी, शिवाजी डमरे, रंजीत शिंदे, सौ. मंगल भगवानराव बोडखे, सौ. सिमा नारायण घनवटे आदिंनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर गोरे, सौ. वर्षा गोविंद यादव, रेखा मधुकर शिंदे, सौ. निशा डिगंबर यादव, सौ. यशोदा सचिन यादव, नंदिनी कैलास यादव, पंकज गिराम, व्यंकटेश यादव, मुक्ताराम यादव, किरण यादव, प्रथम यादव, आदिंनी परिश्रम घेतले.

गोविंद यादव यांचाही गौरव

याच कार्यक्रमात समता साहित्य अकादमीचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गोविंद यादव यांचाही गौरव करण्यात आला. खडकपूरा गल्ली युवक मंडळ आणि सवंगडी कट्टा समुहाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री यादव यांना सन्मानीत करण्यात आले. चांगल्या कामांचं फलीत म्हणजे हा पुरस्कार असून तो आपण आपल्या आईंना समर्पीत करत असल्याची भावना या प्रसंगी गोविंद यादव यांनी व्यक्त केली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button