गंगाखेड

गंगाखेडला ‘साई सेवा’ च्या दसरा महोत्सवाचा शुभारंभ

गंगाखेड : येथील साई सेवा प्रतिष्ठाणचा अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळा या वर्षीही ऊत्साहात साजरा होणार आहे. आज ५१ फुटी पुतळा बनवण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावर्षीचा सोहळा गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी दिली.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळकाका चौधरी यांच्या हस्ते आणि आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य प्रल्हाद झोलकर, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप अळनुरे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हिंगोली येथील विठ्ठल भुसांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून अपप्रवृत्तींचा ५१ फुटी पुतळा बनवला जाणार आहे. नेत्रदीपक आतीषबाजी आणि सांस्कृतीक कार्यक्रम हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य बनलेले आहे. रथ परिक्रमेनंतर गोदातटावर रंगणाऱ्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील हजारो भाविकांची ऊपस्थिती असते.

स्मशानभूमी परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमास साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर, गजानन महाजन, रमेश औसेकर, बाळासाहेब राखे, नंदकुमार भरड, हाजी गफार शेख, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब यादव, संदीप कोटलवार, कारभारी निरस, गजानन जोशी, बाळासाहेब सोनटक्के, सुहास देशमाने, व्यंकटेश यादव, भारत गोरे, प्रथम यादव, येलाप्पा शंकुवाड आदिंसह प्रतिष्ठाणच्या सदस्यांची ऊपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button