महाराष्ट्रराजकारण

भाषणात महात्मा फुलेंऐवजी केला निळू फुलेंचा उल्लेख

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यामध्ये सर्व पक्षांचे नेते आघाडीवर आहेत. राज्याचे माजी राज्यपाल तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले यांच्या बद्दल एक विधान केलं होतं त्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ झाला होता.

अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याला चक्क ‘महात्मा जोतिबा फुले आणि अभिनेते निळू फुले’ यांच्यातील फरक समजला नाही.

सांगितलं जात की, कोल्हापूर मधील चंदगड तालुक्यातील वाळकुडी-केरवडे या ठिकाणी विविध कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रमा वेळी या नेत्यानं भाषण केलं. हा नेता भाजप पक्षाचा असल्याचे सांगितले जाते.

“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन…तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानाचा मुजरा करुन…” असं म्हणत तो नेता आपल्या भाषणाची सुरुवात करतो.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button