देश -विदेशमहाराष्ट्रराजकारण

केंद्र सरकार आणि देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणारे गप्प का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करत मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केलं आहे. या व्हिडीओत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एका ईशान्य भारतातील मुलीला एक प्रश्न विचारतात आणि त्यावर ती जे उत्तर देते त्याने सर्वांचेच डोळे उघडतात. तसेच यानंतर मणिपूरमधील हिंसाचाराचे काही फोटोही दाखवण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकार आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे यावर गप्प का? असा सवालही करण्यात आला.

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एका ईशान्य भारतातील एका मुलीला कोहिमा शहर कोणत्या देशात आहे असा प्रश्न विचारताना दाखवलं आहे. तसेच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अमिताभ बच्चन चीन, नेपाळ आणि भारत असे तीन पर्याय सांगतात. दुसरीकडे ही मुलगी या शोमध्ये पोहचल्याचं पाहून चेष्टा मस्करी करणारे काही नागरिक दिसत आहेत. हा शो देशभरातील लोक पाहत आहेत आणि त्यात रोजगारासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात गेलेले ईशान्य भारतातील नागरिकही दिसत आहेत.

“सर्वांना माहिती आहे, पण तसं मानायला किती जण तयार आहेत”

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही मुलगी ‘ऑडियन्स पोल’ची निवड करते. त्यावर पुन्हा काही लोक हसताना दिसतात. अमिताभ बच्चन पोलमध्ये १०० टक्के लोकांनी कोहिमा भारतात असल्याचं सांगतात. तसेच हे सर्वांना माहिती आहे असं नमूद करतात. त्यावर ती मुलगी सर्वांना माहिती आहे, पण तसं मानायला किती जण तयार आहेत असा प्रश्न करते. त्यावर आधी चेष्टा करणाऱ्यांची मान शरमेने खाली झुकते. यावेळी देशभरातील इतर ईशान्य भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर आपलंच दुःख मांडल्याचं समाधान दिसतं.

Advertisements
Advertisements

“देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त यांनी मौन का?”

या व्हिडीओत पुढे मणिपूरमधील हिंसाचाराचे काही फोटो दाखवत मत मांडलं आहे. “गेले दोन महिने ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः संतापाने धुमसतंय. केंद्र सरकार असो वा देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त यांनी मौन का बाळगलं आहे?”, असा सवाल या व्हिडीओत विचारण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button