महाराष्ट्रराजकारण

रात्री लोणावळ्यात शपथविधीचं प्लॅनिंग? भुजबळ शरद पवारांना म्हणाले, मी तिकडे बघून येतो अन्…

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार अशी चर्चेमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले अजित पवार अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची आणि त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजित पवार यांच्या या कृतीमुळे साहजिकच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार मात्र बऱ्यापैकी निर्धास्त असल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केले.

यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. जो लोक पक्षाच्या चौकटीत होते, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील जे सदस्य शपथविधीला गेले होते, त्यापैकी काहींनी मला फोन केले. आम्हाला याठिकाणी (राजभवनात) बोलावण्यात आले, आमच्या सह्या घेण्यात आल्या, आमचा नाईलाज झाला. पण आमची भूमिका वेगळी आहे. आम्ही दोन-तीन दिवसांत तुम्हाला येऊन भेटतो, असे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त इतर कोणाशीही माझं बोलणं झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी फक्त छगन भुजबळ माझ्याशी बोलून गेले होते. रात्री सगळे लोणावळ्याला होते वाटतं. छगन भुजबळ मला म्हणाले की, जे काही होतंय ते योग्य नाही. मी तिथे जातो आणि काय होतंय ते तुम्हाला कळवतो. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मला थेट शपथ घेत असल्याचे कळवले, असे शरद पवार यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button