महाराष्ट्रराजकारण

संजय राऊतांनी २४ तासात माफी मागावी

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अल्टिमेटम दिला आहे. हिंदू महासभेने केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षे जुनी असल्याचा दावा केला. यानंतर आता तुषार भोसले यांनी संजय राऊतांकडे २४ तासात माफीची मागणी केली आहे. ते बुधवारी (१७ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

तुषार भोसले म्हणाले, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे हे आम्ही घसा ओरडून सांगतो आहे. आज त्यांनी सिद्ध केलं की, त्यांनी केवळ हिंदुत्व सोडलेलं नाही, तर हिंदू धर्मही सोडला आहे. त्र्यंबकेश्वरचे सर्व पुरोहित, विश्वस्त, मंदिर व्यवस्थापन सगळे अशी कोणतीही प्रथा परंपरा नसल्याचं सांगत आहेत.”

“असं असूनही संजय राऊत ही १०० वर्षे जुनी परंपरा आहे असं म्हणत असतील, तर याचा अर्थ संजय राऊत हिंदूची ‘औलाद’ नाही. ते हिंदूची ‘औलाद’ असतील तर त्यांनी ही परंपरा १०० वर्षे जुनी आहे हे सिद्ध करावं,” असं आव्हान तुषार भोसलेंनी संजय राऊतांना दिलं.

Advertisements
Advertisements

मी संजय राऊतांना आव्हान देतो की, २४ तासात माफी मागा, अन्यथा उद्धव ठाकरेंना याचे गंभीर परिणाम भोगायला तयार रहावं,” असंही तुषार भोसलेंनी नमूद केलं.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button