महाराष्ट्रराजकारण

१५ दिवसांमध्ये सरकार कोसळणारच: संजय राऊत

जळगाव: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते रविवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगावच्या पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची महासभा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असे विखे-पाटील यांनी म्हटले होते. त्यावरुन संजय राऊत यांनी विखे-पाटलांचा समाचार घेतला. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर करणे, योग्य नाही. तुमच्या मनात कोणी असेल अन तुम्ही दुसऱ्याबरोबर नांदताय हा तर व्यभिचार आहे. देवेंद्र फडणवीस हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे. त्यांच्या मनात दुसरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी त्यांना बसवा, असे संजय राऊत यांनी म्हटले. विखे पाटलांनी खूप वेळा कन्फ्यूज केले आहे. आधी ते काँग्रेस पक्षात होते मग ते शिवसेनेत आले. शिवसेनेत मंत्री पद उपभोगली, त्यानंतर दुसऱ्या मग तिसऱ्या पक्षात गेले. त्यांच्या भूमिकांमध्ये गोंधळ आहे. उद्या राज्यात सत्तापालट झाल्यास राधाकृष्ण विखे-पाटील आणखी एखाद्या पक्षात जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले.

गुलाबराव पाटलांवर राऊतांची टीका

सुवर्णनगरीतले काही दगड आमच्या सोबत होते, मात्र ते दगडच निघाले, अशी टीका संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली. कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी ४०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. त्याची कागदपत्रं माझ्या जवळ असल्याचा आहेत. विधानसभेत व विधान परिषदेत याबद्दल प्रश्न उपस्थित झाले. मात्र, हे प्रकरण दाबण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी पु्न्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे भाकीत केले. सर्व सरकारच भ्रष्ट आहे. पुढच्या पंधरा दिवसात हे सरकार कोसळेल, सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, त्यावर सही व्हायची बाकी आहे, पुष्पचक्र अर्पण करा, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisements
Advertisements

राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहे, मात्र आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. शिर्डी मतदारसंघातील राहता इथल्या प्रकट मुलाखतीमध्ये विखे पाटील बोलत होते. यापूर्वी तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ शिंदेंबाबत विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button