क्राईममुख्य बातमी

4,000 रुपयांना दहावी-बारावीच्या फेक मार्कशीट; रॅकेट उध्वस्त

मुंबई : दहावी-बारावीच्या फेक मार्कशीटचा बाजारही आता सुरु झाला आहे. याचं एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं असून चार जणांना अटक केली आहे. कोर्टानं या आरोपींना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून दहावी-बारावीची बनावट मार्कशीट विकणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. चेंबूर भागात ही कारवाई करण्यात आली असून या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून एक मार्कशीट ४००० रुपयांना विकली जात होती.

सलमान खान, मोहम्मद नदीम शेख, मोहम्मद मुर्तुजा, दानी खान या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टानं या चौघांनाही १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button