क्राईममराठवाड़ामहाराष्ट्र

सात वर्षीय मुलीचे प्रेत विहीरीत आढळले

चारठाणा : नवहत्ती तांडा येथील शिवानी कृृष्णा राठोड ही दोन दिवसांपूर्वी खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेली होती. परंतू ती परत न आल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला होता. या मुलीचे प्रेत एका विहीरीत आढळून आले आहे. दरम्यान खेळता असतांना विहीरीत पडून सदर मुलगी मयत झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जिंतूर तालुक्यातील नवहत्ती तांडा येथील शेषराव रामसिंग चव्हाण यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून माझी मोठी सुन मंगल हिच्या पायाचे ऑपरेशन झाल्याने त्याला बघण्यासाठी माझी लहान मुलगी निलाबाई कृष्णा राठोड रा.शिवाची वाडी ता.जिंतुर ही नवहत्ती तांडा येथे आली होती. दरम्यान तिची मुलगी शिवानी कृष्णा राठोड ही मागच्या एक महिन्यापासून माझ्याकडे नवहत्ती तांडा येथे होती.

दि.०९ जुन रोजी दुपारी तिनच्या सुमारास शिवानी खेळण्यासाठी घराबाहेर पडली परंतु संध्याकाळपर्यंत घरी परतली नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. दरम्यान दि.१० जुन रोजी सकाळी ११च्या सुमारास पोलीसांनी व फायर ब्रिगेडच्या लोकांनी नवहत्ती तांडा येथील गट नंबर ७७ मधील रामभाऊ धनसिंग चव्हाण यांच्या शेतातील विहीरीत शोध घेतला असता शिवानी मृत अवस्थेत आढळून आली.

Advertisements
Advertisements

चारठाणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सपोऊनि वायाळ, कोनारडे, पोहेकॉ.वसंत वाघमारे, पोकॉ.पवन राऊत, उमेश बारहाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर प्रकरणी चारठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button