परभणीमानवतराजकारण

मानवत पंचायत समितीवर अंबेगावकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

मानवत : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूकीत माजी सभापती पंकज जाधव-अंबेगावकर यांच्या गटाने १८ पैकी १० जागा पटकावत बाजार समितीवर निर्विवाद बहुमत सिध्द केले आहे. या ठिकाणी शनिवार, दि.१० जून रोजी संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर लगेचच मत मोजणीस सुरूवात होवून उशीरा रात्री या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.

संचालक मंडळाच्या १८ जागांच्या निवडणूकीत माजी सभापती पंकज जाधव-अंबेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधरराव कदम यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष पंडीतराव चोखट यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा परीवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. या व्यतिरिक्त बाबासाहेब आवचार यांच्या इंद्रायणी देवी शेतकरी बचाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी काही जागा लढविल्या होत्या. परंतू या निवडणूकीत अंबेगावकर विरुध्द चोखट गटात झालेल्या जोरदार दुरंगी लढतीत अंबेगावकर गटाने बाजी मारली.

या निवडणूकीत सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून अजय फुलारी, सुरज सुंदरराव काकडे (१५७), आकाश पंडीतराव चोखट (२५७), दत्तात्रय ज्ञानोबा जाधव (१४८), पंकज अण्णासाहेब जाधव (२७८), रामेश्‍वर किशनराव जाधव (१५३), विशाल विठ्ठलराव यादव (१८६), संतोष मदनराव लाडाणे (१७४) यांनी विजय मिळविला. सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून सौमित्रा बालासाहेब हिंगे (१७७), सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघातून गजानन प्रल्हादराव घाटूळ (१८१) व सहकारी संस्था महिला मतदार संघातून पंकज वैशाली जाधव (२३२), मीरा विष्णू मांडे (२१२) हे विजयी झाले.

Advertisements
Advertisements

व्यापारी मतदारसंघातून जुगलकिशोर काबरा, ज्ञानेश्‍वर मोरे हे दोघे विजयी झाले. तर ग्रामपंचायत मतदारसंघातून नारायण भिसे, कृष्णा शिंदे हे विजयी झाले. अनुसुचित जाती मतदारसंघातून अंबादास तुपसमिंद्रे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मिरा सुरवसे यांनी विजय पटकावला.

अंबेगावकर यांच्या गटातील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : सुरज काकडे, पंकज जाधव, रामेश्‍वर जाधव, सौमित्रा हिंगे, गजानन घाटूळ, वैशाली जाधव, नारायण भिसे, अंबादास तुपसमिंद्रे, जुगलकिशोर काबरा, ज्ञानेश्‍वर मोरे अशा दहा जणांनी यश पटकावले. तर चोखट गटातील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : आकाश चोखट, अजय फुलारी, कृष्णा शिंदे, विशाल यादव, संतोष लाडाणे, मीरा मांडे व मिरा सुरोसे हे सात सदस्य निवडून आले आहेत. तर इंद्रायणी देवी शेतकरी बचाव पॅनलचे सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून दत्तात्रय जाधव हे विजयी झाले आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button