मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

मेंढपाळाच्या मुलाचे उत्तुंग यश, भारतीय सैन्य दलात भरती

बीड: माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील महादेव शिवाजी सातपुते याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. गरीब कुटुंबातील महादेव याने हे यस संपादन केल्याने कुटुंबासाठी तसेच गावकऱ्यांसाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. या निवडीनंतर महादेव याचे टाकरवन सह पूर्ण जिल्हाभरातुन त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत

माजलगाव तालुक्यात असलेलं टाकरवन हे छोटसं गाव या गावात शिवाजी सातपुते पिढ्या पिढ्या मेंढपाळीचा हा व्यवसाय करतात. घरातील कोणीही कधीच अभ्यासात जास्त रस दाखवला नाही. सगळेच पिढीजात आलेला मेंढपाळाचा व्यवसाय करत आले. शिवाजी सातपुते यांना दोन मुलं त्यात मोठा मुलगा देखील वडिलांना मेंढपाळासाठी सहकार्य करतो. लहान मुलगा महादेव शिक्षणात हुशार मात्र शिक्षण झाल्यानंतर नेमकं करायचं काय असा प्रश्न महादेवला पडला होता काही दिवसात कोणीतरी महादेवाला सांगितलं की सैन्य दलात भरती निघाली आहे.

आई-वडिलांचे अथक परिश्रम आणि वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय सोडून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेल्या महादेव यांनी भरतीची तयारी सुरू केली. सकाळी चार वाजल्यापासून महादेव धावण्याची प्रॅक्टिक्स करायचा. काही दिवसांनी सैन्य दलातील परीक्षांचा फॉर्म भरून त्यांनी परीक्षा दिली आणि त्यात त्याची निवड देखील झाली.

या निवडीनंतर अत्यंत गरीब कुटुंबातला, मेंढपाळ हा वडिलोपार्जित व्यवसाय असलेल्या कुटुंबातला मुलगा आता सैन्य दलात भरती झाल्याने देश सेवेसाठी जाणार असल्याने गावकऱ्यांसह जिल्हाभरात त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या आनंदात गावकऱ्यांनी एकत्र येत महादेवच्या या यशाबाबत गावात चक्क एक मोठी मिरवणूक काढली. ही मिरवणूक देखील साधीसुधी नसून या मिरवणुकीत चक्क डीजे लावण्यात आला होता.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button