क्राईमपाथरीमराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

एस पी टीमचा धडाका,पाथरी परभणी दरोडा उकलला,थोरात ,डहाळे ताब्यात

परभणी

महाराष्ट्र पोलीस

जनसंपर्क अधिकारी कार्यालय

Advertisements
Advertisements

पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, परभणी

वसमत रोड, परभणी- 431401

दुरध्वनी क्र. 02452-226244

ई-मेल: sp.parbhani@mahapolice.gov.in

प्रेसनोट 41/2023

पु. ना. गाडगीळ येथे अपहार करणाऱ्या आरोपीकडून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

आज दिनांक 07/04/2023 रोजी परभणी पोलीस दलातर्फे प्रेसनोट प्रसारीत करण्यात येते की, पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे 3 कोटी 71 लाख 03,226/- येवढ्या रकमेच्या सोन्याचा अपहार झाल्याच्या दाखल गुन्ह्यात परभणी पोलीसांनी 1 कोटी 75 लाख 69,058/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पु. ना. गाडगीळ अँड सन्स परभणी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री चंद्रकांत प्रल्हादराव

कारवार यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन नवा मोंढा परभणी येथे गु.र.नं. 109/2023 कलम 420,

406, 408 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. पोलीस अधीक्षक परभणी यांनी सदर गुन्ह्याची व्याप्ती रक्कम पाहून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्री. प्रदिप अल्लापुरकर, आर्थिक गुन्हे शाखा यांचे कडे देण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी पु. ना. गाडगीळ अँड सन्स शाखा परभणी चा तत्कालीन शाखा व्यवस्थापक विजय विश्राम थोरात, रा. तळेगांव फाटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यास अटक करून त्याने गुन्ह्यातील अपहार केलेले सोने हे गुन्ह्यातील दुसरा आरोपी अक्षय डहाळे, रा. परभणी पु. ना. गाडगीळ अँड सन्स शाखा परभणी चा तत्कालीन कॅशीयर याचे कडे तारण ठेवून 3 टक्के दराने पैसे घेतले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास देखील अटक करून त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील फसवणुकीतील गेला माल पैकी 3345 ग्रॅम वजनाचे सोने अंदाजे 1,73,89,058 रुपये व रोख रक्कम असा एकूण 1,75,69,058/- (एक कोटी पंच्याहत्तर लाख एकोनसत्तर हजार अठ्ठावन्न) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी

CONTACT US-

१०० ०२४५२-२२६२४४७७४५८५२२२२, ९३५६७०९०३७, ९३५६७१३३१६. ९३५६७२०२११

www.facebook.com/parbhanipolice

https://twitter.com/Parbhani Police

यु

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button