ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्र

ओबीसींच्या सर्व लढायांसाठी समता परिषद सज्ज ! – नानासाहेब राऊत

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांकडून तालुकानिहाय आढावा

गंगाखेड :

ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सतत कार्यरत असतात. ओबीसी प्रवर्गावर येत असलेलं संकट परतवून लावणे हे समता परिषदेचे मुख्य ध्येय आहे. ते साध्य करताना कोणत्याही प्रकारची लढाई करण्यासाठी समता परिषद सज्ज आहे, असे प्रतिपादन परिषदेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी केले.

जिल्हाधक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तीन्ही तालुक्यात राऊत यांचा सत्कार आणि आढावा बैठका घेण्यात आल्या. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, माजी जि. प. सदस्य मुंजाभाऊ गायकवाड, चिंतामणी दौंड हे या दौऱ्यात सहभागी झाले होते.  ईतर मागास वर्ग प्रवर्गातील चारशेच्या जवळपास असलेल्या सर्व जातीच्या समाजबांधवांनी पक्षीय विचार बाजूला ठेवून ओबीसी म्हणून एकत्र राहण्याचे आवाहन या बैठकांतून नानासाहेब राऊत यांनी केले.

गंगाखेड येथील शासकीय विश्राम गृहात संपन्न झालेल्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी विठ्ठलराव रबदाड हे होते. ज्येष्ठ नेते, माजी सरपंच विक्रम बाबा ईमडे, बालाजी मुंडे, सुरेश बंडगर, गोविंद लटपटे, बाबासाहेब पारवे, ए. बी. शिंदे, बाबुराव पवार, योगेश फड, डिगंबर यादव, प्रा. पिराजी कांबळे, माधवराव चव्हाण, संदिप सानप, सागर गोरे, राहुल फड, रामेश्वर भोळे, प्रा. मारोती साळवे, विलास गाढवे, वैजनाथराव भंडारे, माऊली डमरे, परसराम गिराम, ईश्त्याक अन्सारी, सिद्धेश्वर मुरकुटे, सखाराम ईरकर, नारायणराव सरवदे, ईश्वर पिसाळ आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक गोविंद यादव, नारायण घनवटे, बालासाहेब यादव, बाळासाहेब सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

पालम :

येथे सावता परिषद तालुकाध्यक्ष दत्ताराम शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने राऊत यांचा सत्कार करण्यात आला. तर पालम तालुका शाखेची आढावा बैठक पेठशिवणी येथील गिरीजाप्पा धाम येथे घेण्यात आली. मंचकराव शिनगारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

बालाजी बरडे, मंचकराव शिनगारे, रूपेश शिनगारे, गोपीनाथ शिनगारे, चक्रधर शिनगारे, गणेश बरडे, विकास शिनगारे, कैलास बरडे, बालाजी शिनगारे, दिपक गाडे, आदिनाथ गिजे, गणेश करंजे, शिवप्रसाद हंगरगे आदिंसह युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या बैठकीस उपस्थिती होती.

पुर्णा :

पुर्णा तालुका आढावा बैठक चांगेफळ येथील दत्त मंदिरात संपन्न झाली. राऊत यांचेसह समता परिषदेचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष नारायणराव अंबुरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष चंदूजी लव्हाळे, मुंजाभाऊ गायकवाड, गोविंद यादव, एन. आय. काळे, विष्णू थोरात, रुपेश शिनगारे, नांदेड तालुकाध्यक्ष देवराव पांचाळ, मुखेड तालुकाध्यक्ष बाळू राऊत आदिंची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष गडगीळे हे होते.

पुर्णा सहकारी साखर कारखाण्याचे संचालक ज्ञानोबा वंजे, गंगाराम वंजे, चेअरमन नागोराव वंजे, श्रीराम गडगीळे, बबनराव सुर्यवंशी, सरपंच नारायणराव जाधव, डिगंबरराव गडगीळे, नाना गडगीळे, रमेश गडगीळे आदिंसह परिसरातील ओबीसी बांधवांची या प्रसंगी उपस्थिती होती. माजी सरपंच अशोकराव गडगीळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक करून पाहुण्यांचे स्वागत केले. उत्तम वंजे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button