
नांदेड :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी संचालक पदी प्रा. डॉ. सुहास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माध्यम शास्त्र संकुलात मागील सतरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. पाठक यांचे या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. विविध सांस्कृतिक महोत्सव, व्याख्याने, कमवा व शिका अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा विभाग कार्यरत असतो.
या नियुक्तीबद्दल विद्यापीठातील विभागाच्या कार्यालयात आज त्यांचा सत्कार करण्यात आला. कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष, पत्रकार गोविंद यादव, विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे संचालक प्रा. डॉ. मारोती गायकवाड, गंगाखेड येथील प्रा. सुहास देशमाने, नांदेडचे संशोधक विद्यार्थी साहेबराव गजभारे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

