देश -विदेश

लातूर तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचे संभाजीनगरात होणार स्नेहमिलन

छत्रपती संभाजीनगर :

लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे२९ ३० एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला आहे. १९८० ते २००५ दरम्यानचे माजी विद्यार्थी यात सहभाग नोंदवणारआहेत. संभाजीनगरहून जवळच असलेल्या म्हैसमाळ येथील थ्री पी टू एस ईट्रॅंजर रिसॉर्ट येथे हे आयोजन करण्यात आलेअसून या मेळाव्यातून अनेक सामाजिक ऊपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक पांडूरंग विडेकर यांनीदिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना माजी विद्यार्थी आणि संभाजीनगर येथील ऊद्योजक पांडूरंग विडेकर यांनी सांगीतले, कीपुरणमल लाहोटीची १९८९९० ची बॅच कायम एकत्र आणि सक्रिय आहे. या बॅचच्या झेप योजने अंतर्गत गरीबविद्यार्थ्यांना मदत केली जाते. तसेच ऋणानूबंध योजने अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंतजवळपास २५ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांचा परोपकाराचा हा पायंडा अधिक जोमाने पुढेचालवण्यासाठी यावेळी १९८० ते २००५ च्या सर्वच माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी कोऑर्डीनेटर प्रसाद कुलकर्णी विशेष परिश्रम घेत आहेत.

Advertisements
Advertisements

तंत्रनिकेतनचे माजी प्राचार्य पी. एच. क्षीरसागर, पर्यवेक्षक नंदू कुलकर्णी ईतर गुरूजनांना आमंत्रित करण्यात आलेअसून या सर्वांचा यथायोग्य सन्मान केला जाणार आहे. तसेच विद्यालयातील गरीब, होतकरू विद्यार्थी, आत्महत्याग्रस्तशेतकरी, विद्यालयातून बाहेर पडून व्यावसायीक झालेले सहकारी या सर्वांना आवश्यक ती मदत करण्याबाबत चर्चा करूननिर्णय घेतले जाणार असल्याचे विडेकर यांनी सांगीतले आहे.

स्नेहमिलन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजक पांडूरंग विडेकर, . रा. विज वितरण कंपनीत मुख्य अभियंता पदीकार्यरत असलेले भुजंग खंदारे, ऊद्योजक चद्रकात जीवडे, सिने दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी, पुणे येथील चेतन कुलकर्णी, पत्रकार, सरपंच संजय जेवरीकर, राजेंद्र नलगे, अविनाश गुंजाळ, सुनील मेंढेकर, संजय आयाचीत आदिंसह सर्व मित्रमंडळी परिश्रम घेत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button