Uncategorized

खासदार जाधव आ.पाटील वरपूडकर टोपे गव्हाणे जेथलिया देशमुख घनदाट यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक संपन्न

परभणी

विशेष

परभणी येथे आ आलेज महाविकास आघाडीच्या बैठकीत उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या बैठकीला खासदार संजय जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते खा.फौजिया खान आमदार राहुल पाटील देशमुख माजी आमदार मीरा रेंगे राजेश टोपे आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार विजय गव्हाणे विजय भांबळे जेथलिया सिताराम घनदाट रेंगे पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

महाविकास आघाडीने केला विजयाचा संकल्प
परभणी लोकसभा मतदारसंघ : सर्व नेतेमंडळी एका व्यासपीठावर

लोकसभा असो, विधानसभा निवडणूक एकमुखाने, एक दिलाने लढण्याचा अन् जिंकण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनीसह पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.15) परभणीत आयोजित केलेल्या मेळाव्यातून सोडला.

पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी खासदार संजय जाधव, माजीमंत्री आमदार राजेश टोपे (घनसावंगी), आमदार सुरेश वरपुडकर, माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार व्यंकटदार कदम, माजी आमदार सिताराम घनदाट, माजी आमदार सौ. मिरा रेंगे, माजी आमदार सुरेश जेथलिया, माजी आमदार शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, संतोष बोबडे, जाकेर लाला, इरफानूर रहेमान खान, श्रीमती जयश्री खोबे, विकास लंगोटे यांच्यासह अन्य नेतेमंडळी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आघाडीच्या या मेळाव्यातून लोकसभा व विधानसभा या निवडणूका सोप्या नाहीत, भारतीय जनता पार्टी नितिमूल्य वगैरे वेशीला टांगून साम-दाम-दंड-भेद वगैरेंसह लढतीत उतरला आहे. त्यामुळेच भाजपा विरुध्दच्या या लढाईत पूर्ण ताकतीनेच उतरावे लागणार आहे, असे स्पष्ट करीत आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीच्या राज्य व केंद्रातील सरकारच्या कारभारावर टीकेचे झोड उठविले. सर्व स्तरावर हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, असे स्पष्ट करतेवेळी संपूर्ण देशभरात विकासाच्या निव्वळ गप्पा मारण्या पलिकडे या सरकारने काहीही केले नाही. विकासाच्या नावाने मत मिळणार नाहीत, हे ओळखल्यानंतर धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याचा प्रकार या सरकारने सुरु केला. परंतु, त्यातूनही यश पदरी पडणार नाही, हे ओळखल्यानंतर आता या दोन्ही सरकारने अब्जावधी रुपये खर्चून जाहीरातींचा भडीमार सुरु केला आहे. बसेस असो, दवाखाने, पेट्रोपंप असो, शाळा, टी.व्ही. असो, वर्तमानपत्रे जळी-स्थळी सरकारने प्रचंड जाहीरातबाजी करीत सर्वसामान्य मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रयत्न तो प्रयत्न केवीलवाणा असून सामान्य मतदार मतपेटीतूनच या सरकार विरोधातील रोष निश्‍चितच व्यक्त करणार आहे, अशी ग्वाहीही या मंडळींनी दिली.
खासदार संजय जाधव यांनी आपल्या भाषणातून 2019 ची निवडणूक वेगळी होती. आता 2024 ची निवडणूक त्यापेक्षा सोपी आहे, या निवडणूकीत आघाडीतील सर्व नेतेमंडळी आपल्या सोबत आहेत, असे स्पष्ट करतेवेळी सर्व नेतेमंडळींनी एक मुखाने, एक दिलाने विरोधकांविरोधात चार हात करीत प्रखरपणे लढण्याची गरज आहे. लढाई जिंकायची आहे, तुमच्या शिवाय ती लढाई होवू शकणार नाही, तुम्ही आहात तरच ही लढाई आहे. या लढाईत यश निश्‍चित आहे, परंतु त्यासाठी रस्त्यावर उतरणे, सर्वसामान्य मतदारांबरोबर थेट संपर्क साधणे गरजेचे आहे, असे नमूद केले. भारतीय जनता पार्टीने विकासाच्या खूप गप्पा मारल्या, धर्माचाही आधार घ्यावयाचा प्रयत्न केला. धर्म, जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेकडो वर्षांची परंपरा असणार्‍या परभणीतील उर्सात जय श्री राम ची नारेबाजी करीत दंगल घडविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करतेवेळी भविष्यातही अनेक प्रसंग येतील, त्यामुळे लढावेच लागेल, भिक घालण्याऐवजी ध्येय समोर ठेवून यश पदरात पाडून घ्यावे लागेल, असा विश्‍वासही व्यक्त केला. ‘ये तो ट्रेलर है, अभि पुरी पिक्चर बाकी है’, असा डायलॉगही मारला. भारतीय जनता पार्टी म्हणजे ‘अलि बाबा आणि चाळीस चोर’ अशी गत झाली आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री नगदी कमाईत गुंतले आहेत. मालामाल झाले आहेत, अशी परखड टिकाही जाधव यांनी केली.
या मेळाव्यास परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

महाविकास आघाडी बैठक,,, जाधव, टोपे, वरपूडकर पाटील भांबळे खान जेथलिया घनदाट रेंगे रेंगे देशमुख गव्हाणे चोथे,,,

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button