क्राईममहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या ‘त्या’ कलाकराला अटक

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केलं. या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मंत्रीपद गमवावं लागलं. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप गाणं राज मुंगासे या रॅपरने तयार केलं होतं. या मराठी गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.  राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल ट्वीट केले आहे.

“आपल्या रॅप साँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?” असे रोहित पवार म्हणाले आहेत.

“शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे.” असे रोहित पवार म्हणाले आहेत.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button