देश -विदेशमुख्य बातमीराजकारण

बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करतायत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे. तसेच, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबतच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल.”

वाघनखांबाबत शंका व्यक्त करणाऱ्यांनी अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय : मुख्यमंत्री 

“आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. वाघनखं आहेत, त्याला इतिहास आहे. ती वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आहे आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं देशासाठी अभिमानाचं काम आहे.  पण दुसरीकडे काही लोक, ज्यांना विरोध, द्वेष, मत्सर सरकारच्या प्रत्येक कामावर व्यक्त करतात. त्यांनीच वाघनखांबाबत आक्षेप व्यक्त केला आहे. शंका व्यक्त केली आहे. हे दुर्दैवी आहे. पण हे शंका व्यक्त करणारे लोक आहेत, त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय. सांस्कृतिक कार्य विभाग काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Advertisements
Advertisements

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरिबांची गरज उरलेली नाही : मनोज जरांगे 

मराठा समाजाच्या मुलांचं भलं होऊ नये, असं सरकारचं षडयंत्र आहे त्याचसाठी आरक्षण दिलं जात नाहीये असा गंभीर आरोप उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरिबांची गरज उरलेली नाही अशी टीका त्यांनी केली. 29 ऑक्टोबरला मराठा आंदोलनकर्त्यांची बैठक घेत पुढील दिशा ठरवली जाईल असं जरांगे म्हणाले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button