देश -विदेशमहाराष्ट्रमुख्य बातमी

आकाशात उडालेले प्रशिक्षणार्थी विमान १०० फूट दरीत कोसळले

मुंबई – बालाघाटच्या नक्षलग्रस्त भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. या अपघातात महिला वैमानिक आणि प्रशिक्षकाांना आपला जीव गमवावा लागला. वैमानिकाचे नाव रुखशंका आणि प्रशिक्षकाचे नाव मोहित आहे. गोंदिया एटीसीचे एजीएम कमलेश मेश्राम यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्रातील बिरसी येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. तेथून प्रशिक्षणार्थी विमानाने दुपारी दोन वाजता उड्डाण केले होते. अडीच तासांनंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याचा शेवटचा ठावठिकाणा सापडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती जळताना दिसत आहे.
किरणपूरजवळील भाक्कू टोला येथील जंगलात ही घटना घडली. हे जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले की, ट्रेनर आणि एक महिला ट्रेनी पायलट विमानात होते. विमानाच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह जळताना दिसत आहे.
दुसऱ्याची वैमानिकाची माहिती मिळू शकली नाही. हे प्रशिक्षणार्थी विमान महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी विमान होते. बालाघाट जिल्ह्याच्या सीमेवर ते कोसळले आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या किरनापूरच्या कोस्मारा पंचायतीअंतर्गत भाक्कू टोला गावात ही घटना घडली.
दोन पहाडांमध्ये कोसळले विमान

प्रशिक्षणार्थी पायलटचे नाव रुकशंका वरसुका आणि पायलटचे नाव मोहित आहे. बालाघाट येथील पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितलं की, हे प्रशिक्षणार्थी विमान होते. ते गोंदियातील बिरसी विमानतळावरून उडाले होते. ही घटना बालाघाटवरून ४० किलोमीटर अंतरावर घडली. जंगलात पोहचण्यास अडचणी येत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button