क्राईममुख्य बातमी

नवले पुलाजवळ ट्रकची आठ ते नऊ वाहनांना धडक

पुण्यातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला  आहे. नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. यात आठ ते नऊ वाहनं धडकली आहेत. या अपघातात वाहनांचं  मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (24 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला.  या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे  विचित्र अपघात घडला. आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाहनांचं मोठं नुकसान; चालक संतापले!

या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. ट्रकच्या धडकेत अनेक महागड्या वाहनांचं नुकसान झालं आहे. सुझूकी, ह्युंडाई, रेनॉल्ट कंपनीच्या महागड्या कार मागच्या बाजूनं चक्काचूर झाला आहे. त्यासोबतच काही ट्रक आणि टेम्पोला देखील धडक बसली आहे. या अपघाामुळे नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली. हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. शिवाय गाडी चालकांनीदेखील ट्रक चालकावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सगळी वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

Advertisements
Advertisements

पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button