परभणीमुख्य बातमी

मराठा समाजाचे आंदोलन तीव्र; आज परभणी बंदची हाक

बाजारपेठा राहणार बंद

परभणी : मराठा आरक्षण (Maratha Rservation)  या  विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे.  परिणामी राज्यातल्या प्रत्येक गावात शहरात आंदोलन सुरु आहेत. मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आज परभणी जिल्हा बंदची (Parbhani Bandh)  हाक देण्यात आली आहे. जिल्हाभरातील बाजारपेठ आज बंद राहणार आहेत. सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील बाजारपेठ बंद राहणार आहे.

परभणी जिल्ह्यातील गावा गावांमध्ये आंदोलन सुरू आहेत आता हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे.  आज जिल्हाभरामध्ये चक्काजामच आयोजन करण्यात आले आहे. शहरात तीन ठिकाणी तर जिल्हाभरात ठिकठिकाणी आज चक्काजाम केला जाणार आहे.  तसेच  जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्यानंतर सर्व प्रकारची शेतमाल वाहतूक बंद करण्यात येणार आहे.  सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.  त्यामुळे सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी ही करण्यात आली आहे. एकीकडे साखळी उपोषण आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे..या बंद बरोबरच झरी बोरी आणि सिंगणापूर या तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलकांच्या धास्तीमुळे परभणीची बाजारपेठ बंद 

परभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी मराठा आरक्षणासाठी तब्बल तेरा पेक्षा जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या बरोबरच मानवत आणि संपूर्ण शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र परभणी शहरात काही तरुणांचे गट दुचाकीवरून घोषणाबाजी करत फिरत असल्यामुळे  परभणीची बाजारपेठ  कालपासून बंद ठेवण्यात आलेली आहे.  या तरुणांच्या धास्ती मुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकान आज उघडलीच नाहीत

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button